‘राजदेवांसारखे सारखे कार्यकर्ते प्रत्येक गावात हवेत!’ – खा. नीलेश लंके

खा. नीलेश लंके
सरपंच रविंद्र राजदेव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, नेत्रतपासणी व वृद्धांना काठ्यांचे वाटप

पारनेर (उपसंपादक दिपक भिका वरखडे) । प्रत्येक गावात रविंद्र राजदेव यांच्यासारखा कार्यकर्ता उभा राहिला, तर तालुक्यात आरोग्य, शिक्षण आणि सर्वसामान्यांचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, असे प्रतिपादन खा . नीलेश लंके यांनी केले. नांदूरपठारचे माजी सरपंच रविंद्र राजदेव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर, डोळे तपासणी शिबिर आणि वृद्धांना काठ्यांचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पारनेरच्या नगराध्यक्ष विद्याताई कावरे ,उपनगराध्यक्ष सुप्रियाताई शिंदे ,पंचायत समिती सदस्य जुन्नर शांताराम दाते,नांदूर पठार सेवा सोसायटी चे व्हाईस चेअरमन बाळू चौधरी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक लंके ,राणीताई लंके ,मोहनराव रोकडे ,अशोक घुले ,किरण ठुबे ,प्रसाद नवले , महेंद्र गायकवाड, दिनेश चौगुले ,पोपटराव गुंड , बाळासाहेब गुंड ,दिपाली औटी ,सारिका आग्रे ,प्रकाश चिकने,गंगाराम चिकने,पांडुरंग येवले , अर्जुन भालेकर ,योगेश मते , डॉ बाळासाहेब कावरे , बाळासाहेब पुंडे ,बापूसाहेब ठुबे, अजित भाईक, हरिभाऊ आहेर ,नारायण राजदेव , भानुदास आग्रे ,जयराम चौधरी ,दिनेश आग्रे ,मदन देशमाने ,दत्ता चौधरी व गटातील सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक सोनिया राजदेव यांनी तर आभार रविंद्र राजदेव यांनी मानले.
खा. नीलेश लंके
सामाजिक उपक्रमांची जोड
वाढदिवस म्हटला की , डीजे, फटाके आणि बॅनरबाजी अशी परंपरा रूढ झाली आहे. मात्र राजदेव यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी आणि वयोवृद्धांना आधारासाठी काठ्यांचे वाटप करून समाजोपयोगी संदेश दिला. येथे संकलित होणाऱ्या एका रक्तपिशवीमुळे एक जीव वाचतो, त्याचे कुटुंब वाचते, असे सांगत खा. लंके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
आरोग्य, शिक्षणासाठी मदत आवश्यक
एखाद्या व्यक्तीला सामान्य मदत आठ दिवसांनी दिली , तरी चालते , मात्र वैद्यकीय उपचारासाठी मदत तात्काळ लागते. आरोग्य आणि शिक्षणासाठी विलंब चालत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी राजदेव यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. आरोग्य- शिक्षणासाठी तत्परतेने धावणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे रविंद्र राजदेव,” असे ते म्हणाले.
मिश्किल टोला , उपस्थितांत हशा
जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात बोलताना खा. लंके यांनी मिश्किल शैलीत वातावरण हलके केले. अनेकांनी रविंद्र राजदेव यांचा विचार करा , असे सांगितले, तर काहींनी त्यांच्या पत्नी सोनिया यांची शिफारस केली. तुम्ही दोघांनी ठरवा माझा की तुझा नंबर ? एकमत न झाल्यास छापा-काटा करा, नाहीतर ‘शोले’ चित्रपटातील सिक्का आणा! असे म्हणताच उपस्थितांत एकच हशा पिकला.
कर्म तुमच्यासोबत असते
समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. मात्र कष्ट करत राहा; कर्म तुमच्यासोबत असते, असे सांगत त्यांनी राजदेव दाम्पत्याच्या समाजकार्याचा गौरव केला. “राजकारणात अनेक जण निवडणुकीपुरते फिरतात. निवडणूक झाली की लोकांना नमस्कारही करत नाहीत. मात्र राजदेव सरपंचपदापासून सातत्याने काम करत आहेत. त्यांनी कुटुंबाचा विचार न करता समाजासाठी स्वतःला वाहून घेतले,असे ते म्हणाले.
वयोवृद्धांची काळजी ठरली आदर्श ,
निवडणूक आली की , वयोवृद्धांची आठवण होते, इतर वेळी कोणी ढुंकूनही पाहत नाही. मात्र दुर्लक्षित वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम राजदेव दाम्पत्य करत आहे, असे सांगत त्यांनी या कार्याची प्रशंसा केली.
मतदान स्वाभिमानी असावे .
कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याचे मूल्यमापन आर्थिक ताकदीवर नव्हे, तर समाजासाठी केलेल्या कामावर झाले पाहिजे, असे मत व्यक्त करत खा. लंके म्हणाले, रात्री-अपरात्री फोन केल्यावर मदतीला धावणारा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. मतदान विकले जाऊ नये , ते स्वाभिमानी असावे. समाजासाठी वाहून घेणाऱ्याच्या पाठीशी मतदार उभे राहिले, तर समाज बदलायला वेळ लागणार नाही.
१,८०० कोटींची विकासकामे
मी आमदार झाल्यानंतर काय काम करणार, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र केवळ अडीच वर्षांत गेल्या २५ वर्षांत झाली नाहीत , इतकी विकासकामे मतदारसंघात मार्गी लावली. तब्बल १ हजार ८०० ते १ हजार ९०० कोटी रुपयांची कामे मंजूर करून घेतली, असा दावा खासदार लंके यांनी यावेळी केला. रविंद्र राजदेव यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या या सामाजिक उपक्रमांमुळे नांदूरपठार परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, वाढदिवस साजरा करण्याची हीच खरी सामाजिक दिशा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here