सौंदर्यशास्त्रात वर्षा जाधव अव्वल; ‘बेस्ट ऑफ ब्युटीशियन’ पुरस्काराने सन्मानित

वर्षा जाधव

शिरपूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर पवन मराठे) | केंद्रीय शिक्षण व प्रशिक्षण केंद्र, दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय कौशल्य विषयाच्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण व व्यवस्थापन पदवी परीक्षेत शिरपूर येथील ‘वुमन्स इरा ब्युटी पार्लर’च्या संचालिका वर्षा प्रशांत जाधव यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. त्यांनी या परीक्षेत ‘ए प्लस’ श्रेणीसह ‘बेस्ट ऑफ थ्री’मध्ये स्थान मिळवत खानदेशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

 

खानदेशातील प्रतिष्ठित पिकासो ग्रुप संचलित ‘मनोजय कम्युनिकेशन्स’च्या महिला आत्मनिर्भर योजना विभागांतर्गत हे प्रशिक्षण राबवण्यात आले होते. वर्षा जाधव यांनी मेकअप ॲडव्हान्स थिअरी, ज्वेलरी अँड कॉस्मेटिक्स, फेस्टिवल लुक्स आणि फॅशन सेन्स, बॉडी स्पा आणि योगथेरपी, पार्लर मॅनेजमेंट यांसारख्या विषयांत विशेष प्राविण्य मिळवून आपले कौशल्य सिद्ध केले आहे.

प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक तथा सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि पिकासोचे ट्रेनिंग हेड संजय निकुंभ यांचे वर्षा जाधव यांना विशेष मार्गदर्शन लाभले. निकुंभ, जे राज्य पुरस्कार प्राप्त सिने-नाट्य रंगभूषाकार आहेत, त्यांच्या हस्ते वर्षा जाधव यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.  वर्षा जाधव या नाशिक येथील प्रसिद्ध सिने आर्टिस्ट तथा अँकर सचिन जाधव यांचे बंधू आणि ‘जे.पी. मोबाईल’चे संचालक प्रशांत जाधव यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here