पर्यावरण रक्षणासाठी यावल तालुक्यात अशोक तायडे यांची तालुका सचिवपदी निवड

अशोक तायडे

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर अशोक तायडे) |  यावल तालुक्यातील पर्यावरणविरोधी प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी आता आक्रमक पावले उचलली जाणार आहेत. ‘पर्यावरण संवर्धन व विकास समिती’च्या यावल तालुका सचिवपदी डोंगर कठोरा येथील अशोक खंडू तायडे यांची निवड करण्यात आली आहे.

 

वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी. के. आरिकर यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुखदेव भालेराव, सचिव प्रा. योगेश गोसावी आणि जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र वराडे (अप्पा) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव अशोक तायडे हे केवळ पर्यावरण क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. ते युवा क्रांती फाऊंडेशन अंतर्गत ‘पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण’ संघटनेचे तालुकाध्यक्ष, ‘बुलंद पोलीस टाईम’चे जिल्हा प्रतिनिधी आणि ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियानाचे समन्वयक म्हणून कार्य करत आहेत. वृक्षारोपण, जैवविविधता जतन आणि जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे.

अवैध उत्खनन आणि वृक्षतोडीविरोधात एल्गार यावल तालुक्यात होणारी अवैध वृक्षतोड, नदीपात्रातील उत्खनन, वाढते प्रदूषण आणि पाणीटंचाई यांसारख्या गंभीर समस्यांवर आता समितीच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव निर्माण केला जाणार आहे. तायडे यांच्या निवडीमुळे पर्यावरण संरक्षणाचा लढा अधिक तीव्र होईल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार शब्बीर खान, राहुल जयकर, फिरोज तडवी, एडवोकेट दत्ता सावकारे, डॉक्टर तुषार सोनवणे, राजू भालेराव यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तालुक्यात वृक्षलागवड आणि जलसंधारणासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here