आज आढळले ६०५ कोरोनाबाधित; ८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज (दि.२४) कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नव्याने ६०५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान ५२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सद्यपरिस्थितीत ६२०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज आढळलेले ६०५ रुग्णांसह आता जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २२,९२३ इतकी झाली आहे. उपचारादरम्यान आज ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने, आजवर कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या ७३७ इतकी झाली आहे.
आज आढळलेल्या ६०५ कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक रुग्ण मुक्ताईनगरला १२९, त्यानंतर जळगाव शहर ११०, जळगाव ग्रामीण ५४, भुसावळ ४६, अमळनेर १९, चोपडा ५०, पाचोरा २३, भडगाव १, धरणगाव १६, यावल २९, एरंडोल ५३, जामनेर ६, रावेर ९, पारोळा १४, चाळीसगाव ३०, बोदवड ४ व इतर जिल्ह्यातील ४ रुग्ण असा समावेश आहे. जिल्ह्यातील १५९८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सध्या ६,२०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज मृत्यू झालेल्या ८ रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ३, जामनेरमधील २ तर एरंडोल, जळगाव तालुका, रावेर मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







