पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत टीडीआरएफ आणि अग्नीशमन दलाची टीम महाडमध्ये

रायगड (जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील) – महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मदत कार्य वेगाने व्हावे यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले असून त्यांच्या सोबत ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ आणि अग्नीशमन दलाची दोन पथकेही घटनास्थळी दाखल झाली आहेत.
महाड दुर्घटना घडल्यानंतर पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे रात्रीच महाडला रवाना झाले होते. त्याचवेळी त्यांनी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांना ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ आणि अग्नीशमन दलाची दोन पथके घटनास्थळी मदतकार्यासाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिंदे यांच्यासोबतच ठाणे महानगरपालिकेची टीडीआरफ आणि अग्नीशमन दलाची दोन पथके रवाना झाली. ही दोन्ही पथके आज सकाळी ७ वाजता दाखल होवून एनडीआरएफ टीमसोबत मदतकार्यास सुरूवात केली.
सिडको महामंडळाची टीम ही रात्रीपासून NDRF बरोबर खांद्याला खांदा लावून अजूनपर्यंत काम करीत आहे, प्रतीक शिंदे हे अधिकारी जागेवर आपल्या सहकाऱ्याबरोबर कार्यरत आहेत. पनवेल महापालिकेची टीम देखील मदत देण्यात आली होती, सकाळी प्रांत साहेबानी परवानगी दिल्यावर सदर टीम परत बोलावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here