साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत सहभागी ५५ मंडळांचा क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेकडून भव्य सत्कार

अण्णाभाऊ साठे

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्याच्या वतीने मागील २५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा जपत यावर्षीही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकीतील मंडळांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.

रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सोलापूर शहरात निघालेल्या भव्य मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या तब्बल ५५ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उत्सव मंडळांचा क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विशेष स्वागत व सत्कार करण्यात आला.

क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रमुख मान्यवरांचा तसेच मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व ५५ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह, फेटा, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

या सोहळ्याला सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, माजी पक्षनेते देवेंद्र भंडारे, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णू कसबे, मातंग समाजाचे अध्यक्ष सुहास शिंदे, माजी नगरसेवक गुरुशांत धुतुरगावकर, माजी नगरसेवक दीपक राजगे, अक्कलकोट मातंग समाज अध्यक्ष सुनील खवळे, युवा नेते सुधाकर पाटोळे, लष्कर मातंग समाज अध्यक्ष भीमराव दाजी गायकवाड, शहर अध्यक्ष विजय अडसुळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय साठे, सोनू देवकुळे, लेखक किशोर जाधव सर, टी. एस. क्षीरसागर सर, प्रा. परमेश्वर हटकर, श्रीकांत बोराडे, बापूजी गायकवाड, रोहन लोंढे यांच्यासह सोलापूर शहर, जिल्हा व महाराष्ट्रातून आलेले प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here