कोलंबियामध्ये भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, ५७० जखमी

कोलंबियामध्ये भूकंप

पेरेरा (वृत्तसंस्था) – सोमवारी कोलंबियामध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे किमान १३२ लोकांचा मृत्यू झाला आणि ५७० जण जखमी झालेत. देशातील पाच प्रमुख शहरांमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, या आपत्तीबाबत राष्ट्रपतींसोबत झालेल्या बैठकीत सहभागी असलेल्या एका संघटनेने सांगितले की, केवळ पेरेरा शहरातच ६० जणांचा मृत्यू झाला आहे. या वृत्तात नमूद केले आहे की, देशभरातील पाच प्रमुख शहरांमध्ये ‘रेड अलर्ट’ आहे.

कोलंबियाच्या अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच ८६ इमारती कोसळल्या असून, सात विमानतळांवरील कामकाज स्थगित करण्यात आले आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या माहितीनुसार, सुमारे 5 लाख लोकसंख्या असलेले पेरेरा शहर भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 64 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर स्थित आहे. राजधानी बोगोटासह कोलंबियाच्या अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, धोक्याचे सायरन वाजल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी अनेक इमारतींतून बाहेर पडून रस्त्यांवर आश्रय घेतला. यापूर्वी, अधिकारी अबेलार्डो डी ला एस्प्रिएला यांनी सांगितले होते की, १५७७ निवासी इमारतींचे नुकसान झाले आहे, तर ३७ इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’नुसार, त्यांनी माहिती दिली की, ६० हून अधिक इमारती कोसळल्या आणि १८ आरोग्य केंद्रे व ५२ शाळांचेही नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here