सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : वडूज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या नामफलकाचे अनावरण आज उत्साहात संपन्न झाले. यावेळी माजी नगरसेवक शहाजीराजे गोडसे, माजी उपसरपंच परेश जाधव, संतोष गोडसे, गणेश गोडसे, धनाजी गोडसे, सुशांत पाले॑कर, निलेश गोडसे, संपत गोडसे, हरीशचंद्र गोडसे, धनंजय पवार, अमोल साळुंखे, लखन पवार, मंगेश मोहिते, सागर पवार, विजय शेटे, अमिन मुल्ला, सुहास गोडसे शिवप्रेमी, ग्रामस्थ आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वडूज शहरात गेल्या अनेक दिवसापासून या चौकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या अशी मागणी शिवप्रेमी तरुण मंडळाकडून होत होती. नगरपंचायतीने या मागणीचा ठराव मंजूर करून या चौकाचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे केले होते. त्याचाच नामफलक आज बसविण्यात आला. मान्यवर व शिवप्रेमी यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरणावरण करण्यात आले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय अशी घोषणांनी व शिवगर्जनेने परिसर दुमदुमून गेला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमा असलेल्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थिती मान्यवरांनी संभाजी महाराजांच्या शौर्याचा, त्यागाचा इतिहास सांगता तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले. उपस्थित शिवप्रेमी यांच्या वतीने सदर मुंबई चौकाचे सुशोभीकरणाची मागणी केली. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, केवळ नामफलक बसवून चालणार नाही तर नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने या चौकाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी यावेळी उपस्थिती शिवप्रेमी व नागरिकांनी केली.







