काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे नाशिक येथील १० दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न; मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रकांचे वाटप

काँग्रेस

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा नाशिक येथे समारोप झाला. शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सहभागी जिल्हाध्यक्षांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सचिव वामशी चंद रेड्डी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. संघटन बळकटीकरण, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि आगामी राजकीय रणनीती या विषयांवर शिबिरार्थींना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या समारोपप्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सतेज (बंटी) पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी बी. एम. संदीप, जेंटल आर्टचे मुख्य प्रशिक्षक अरुण शर्मा आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here