मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम; तासखेड्यात फराळ वाटप

मंगळग्रह

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | एका बाजूला दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे दिवाळीचा सण… अशा परिस्थितीत गरजू कुटुंबांच्याही घरात आनंदाचा दीप उजळावा आणि त्यांच्या दिवाळीत गोडवा निर्माण व्हावा, या सामाजिक बांधिलकीतून मंगळग्रह सेवा संस्थेने माणुसकीचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेच्या वतीने तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन गरजवंतांना दिवाळी फराळाचे वाटप केले जात असून, शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर) तासखेडे येथे जवळपास ८५ गरजू कुटुंबांना फराळाची पाकिटे वितरित करण्यात आली.

 

यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी गावाचे सरपंच सुनील पाटील तसेच  मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, मंगल सेविकारी प्रकाश मेघा, बाळा पवार मंदिराचे सेवेकरी गावातील दगा भील, बापू बिऱ्हाडे, सांडू बिऱ्हाडे, संतोष पाटील, मच्छिंद्र पाटील आदींसह  सामाजिक कार्यकर्त्यांनीही या उपक्रमात सहकार्य केले.

याप्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गरजवंत शेतकरी, शेतमजूर व अन्य घटकांना फराळ, कपडे आणि अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here