सर्व शिक्षक संघटनेंच्या निवेदनांमुळे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोविड- 19 विषयी सभा संपन्न

वर्धा (विदर्भ संपादक ॲड. चंद्रकांत कराळे) – गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट 2020 रोजी जि. प. वर्धा चे सभागृहात कोविड- 19 मध्ये काम करतांना शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी विषयी माहिती समजून घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ओम्बासे यांचे अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी श्री बगळे, नगर परिषद वर्धाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पालिवाल, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक/ प्राथमिक) श्री नरड व आरोग्य विभागाचे अधिकारी यांचे उपस्थितीत सभा संपन्न झाली.
कोविड- 19 च्या संदर्भात शिक्षकांवर अन्यायकारक व अपमानास्पद काढलेल्या परिपत्रकाला विरोध दर्शवून विविध शिक्षक संघटनांनी प्रशासनाकडे जी निवेदने दिलीत त्याची दखल म्हणून आज ही विशेष सभा घेण्यात आली या सभेमध्ये जिल्हा परिषद शिक्षक व अन्य शिक्षक यांचे वेतन अडवू नये असे B.D.O.यांना निर्देश देणार, पर्यायी व्यवस्था झाल्यास प्राधान्याने महिला शिक्षकांना सर्व्हेक्षणाच्या कामातून वगळणार, 50 लाखांचे विमा संरक्षण, कोविड- 19 चे काम करतांना मृत्यू झाल्यास शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू, प्रगणकाकडे सर्व्हेशनासाठी असलेली कुटुंब संख्या समप्रमाणात करण्याचा प्रयत्न करणार, कोविड- 19 च्या कामात सतत कार्यरत आहे अश्या शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पर्यायी व्यवस्था झाल्यास कार्यमुक्त करणार, सर्व्हक्षणाच्या कामात पत्रके वाटण्यासाठी पर्यायी व्यवस्था या विषयांवर चर्चा करण्यात आली, तसेच कोविड- 19 च्या कामात अन्य काही समस्या असल्यास संघटनांनी प्रशासनाकडे संपर्क साधावा असे सुचविण्यात आले.
सुरवातीला मुख्य कार्यकारी जि. प. वर्धा यांनी सदर सभा विविध संघटनांचे निवेदने प्रशासनाला प्राप्त झाल्यामुळे त्यावर निर्णय घेण्यात येत आहे हे स्पष्ट केले. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धाचे कार्यवाह महेंद्र सालंकार यांनी वेतनासाठी BDO च्या प्रमाणपत्राची अट रद्द करावी, शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत असल्यामुळे , शिक्षकांवर कारवाईचे कोणतेही पत्र यापुढे काढू नये, सर्व्हेक्षणाच्या कामातून प्राधान्याने महिला शिक्षकांना कार्यमुक्त करावे, प्रगणकाकडे सर्व्हेक्षणासाठी असलेली कुटुंब संख्या समप्रमाणात करण्यात यावी, पर्यायी व्यवस्था झाल्यास सद्या कार्यरत असलेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करावे यासाठी शिक्षण विभागाने आढावा घ्यावा, अशी जोरदार मागणी केली. त्यामुळे वरील मागण्या अधिकाऱ्यांनी तात्काळ निकाली काढण्याचे मान्य केले. यावेळी इतर शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा शिक्षकांच्या कोविड – 19 च्या कामातील समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी मागणी केली. नेते मंडळींच्या शिफारसीने कोविड- 19 च्या कामासाठी निघालेले आदेश योग्य कारणाशिवाय रद्द करण्यात येऊ नये अशी जोरदार मागणी संपूर्ण सभागृहाने केली. त्यामुळे मंचावरील अधिकाऱ्यांनी असला प्रकार यापुढे अजिबात होणार नाही अशी ग्वाही सभागृहाला दिली.
यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, कार्याध्यक्ष पांडुरंग भालशंकर, कोषाध्यक्ष शशांक हुलके, प्रसिद्धी प्रमुख विमाशी संघ वर्धा व जूनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा सचिव प्रमोद खोडे, खाजगी प्राथमिक संघाचे अध्यक्ष रविबाबू शेंडे, सचिव सुरेशकुमार बरे, यांनी यावेळी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. तसेच यावेळी म. रा. शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय कार्यवाह अजय वानखेडे, जिल्हाध्यक्ष प्रवीण भोयर, चंद्रकांत ठाकरे, मुख्याध्यापक संघटनेचे विदर्भ सचिव सतीश जगताप, प्रदीप गोमासे, प्रजासत्ताक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अरुण कुमार हर्षबोधी, अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना उमेश फुलमाळी, राज्य सरचिटणीस म. रा. प्रा. शि. समिती विजय कोंबे, अध्यक्ष महा. रा. प्रा. शिक्षक संघ लोमेश वऱ्हाडे, मनोहर डाखोळे, मनीष ठाकरे, छत्रपती फाटे, डॉ. इशरत खान, सुनील कोल्हे, अरुण झोटींग, राजकुमार जाधव, सौ मनीषा साळवे, गौतम पाटील, प्रमोद तेलंग, मिलिंद मुळे, अजय भोयर, मुकेश इंगोले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here