वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट 2020 गुरुवारला वर्धा जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रविबाबू शेंडे यांच्या नेतृत्वात विमाशिचे कार्यवाह महेंद्रजी सालंकार यांचे मार्गदर्शनात खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव सुरेशकुमार बरे , प्रसिद्धीप्रमुख महेंद्र झाडे, सरचिटणीस कविता मेश्राम, कार्यकारणी सदस्य किरण जंगले ,प्रकाश गुजर , संजय वंजारी , सौ.विना भोयर, मारोती बर्ड, प्रकाश गुजर ,दिनेश मुडे यांच्या उपस्थितीत. सचिनकुमार गुल्हाने अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक )शिक्षण विभाग वर्धा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माहे ऑगस्ट 2020 च्या वेतना बाबत चौकशी केली असता जिल्हा कोषागार कार्यालय वर्धा येथून संबंधित बिलाला त्रुटी लागून असल्यामुळे त्यास BDO चे प्रमाणपत्र जोडल्या शिवाय वेतन देयके मंजूर केली जाणार नाहीत अशा प्रकारची माहिती प्राप्त झाल्यामुळे वेतन पथक कार्यालयातील अधिक्षक सचिनकुमार गुल्हाने यांच्याशी खाजगी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करण्यास भाग पडले असून देयकातील त्रुटी बाबत संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ चौकशी करायला लावले व चर्चा झाल्यानंतर त्रुटीची पूर्तता करण्यात आली त्यानंतर कोषागार कार्यालयातील अधिकारी यांची सचिन कुमार गुल्हाने अधीक्षक , सुरेशकुमार बरे सचिव खाजगी प्राथमिक शिक्षक संघ, विजयाताई बासनवार यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली असता उपरोक्त विषयाचे सविस्तार निवारण करून घेतले त्यामुळे शिक्षकांचे माहे ऑगस्ट 2020 वेतन 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुख्याध्यापकाच्या खात्यात जमा होण्याची शक्यता श्री नेवारे सहाय्यक ,वेतन पथक कार्यालय वर्धा यांचेकडून वर्तविण्यात आली आहे .







