मुंबई पोलीस आयुक्त यांच्यावर ताशेरे ओढल्यावर राज्य सरकार जागे होणार का ?

राज्य सरकारच पाठीशी घालत असल्याने संपूर्ण मुंबई पोलिसांची मानहानी झाल्यास याच राज्य सरकारलाच जबाबदार धरावे लागेल !

कल्याण (प्रतिनिधी राजेंद्र रहाळकर) –सध्या गाजत असलेल्या सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून थेट CBI कडे दिला ! तिथेच मुंबई पोलिसांची मानहानी झाली ! आणि याला जबाबदार कोण ? तर हेच मा. परमवीर सिंग , मुंबईचे पोलीस आयुक्त ! यांची त्याचवेळी तात्काळ पदानवती करायला हवी होती ! त्यांना या पदावरून दूर करावयास हवे होते !
पण डुप्लिकेट बाळ धुरी उर्फ मा.अनिल देशमुख गृहमंत्री सांभाळत असलेल्या गृहखात्याच्या मुंबई विभागात निर्णय घेण्याचा अधिकार हा भलतीकडेच दिसत आहे ! थोरल्या साहेबांची याकडे डोळेझाक कशी ? चार दिवसांच्या सेल्फ कॉरंटाईन पासून अजून खुडूक झाले आहेत ?सुशांतसिंग मृत्यू प्रकरणात 66 दिवसांत प्रकरण मुंबई पोलिसांकडे होते ! चौकशीही सुरू होती ! पण तरीही मुंबई पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणात कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा नोंदवून घेतला नाही ? 66 दिवसांत तपास रेंगाळत ठेवला ?
याआधी काही दिवसांपूर्वी याच प्रकरणाशी संबंधित दिशा सालीयन या तरुणीचा मृत्यू झाला ! कोण म्हणतं पडून मेली तर कोण म्हणतं आत्महत्या केली ! पण दुर्दैव म्हणजे या मुलीच्या आई वडिलांची हिम्मतच झाली नाही आणि अजूनही होत नाही की “चार ओळींची तक्रार नोंद करावी “! मुंबई पोलिसांना हे लांच्छनास्पद नाही का ? याचं महत्वाचं कारण याच मुंबई पोलीस आयुक्तांची कार्यपद्धती ! यांच्यामुळेच मुंबई पोलीस दलाला लांच्छन लागले जात आहे ! आता ज्याप्रकारे CBI बरोबर ED , नार्कोटिक्स विभागाची कसून चौकशी सुरू आहे तसं मुंबई पोलिसांकडून 66 दिवसांत काहीच घडलं नाही ? या काळात पेंग्विन बघायला जात होते का मुंबई पोलीस आयुक्त ?
या प्रकरणात संपूर्ण दोष हा मुंबई पोलीस आयुक्तांकडेच जातो ! या प्रकरणात या तिन्ही यंत्रणांपैकी कुणीही या आयुक्तांना चौकशीला बोलावलं तर पोलीस दलाची केवढी नाचक्की होईल ? हे या अनैतिक आणि अनैसर्गिक क्रियाकर्म करून बसवलेल्या महाराष्ट्र सरकारला आणि त्यातील सत्ताधारी प्रमुखांना समजणार नाही ! पण संवेदनशील व पोलीस दलाची प्रतिष्ठा सतत सांभाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना याची जाणीव असणारच !
पोलीस दलात मध्यंतरी 20 – 22 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जो खेळ करण्यात आला तेव्हाच या पोलीस आयुक्ताची कुवत सिद्ध झाली ! त्यांच्या सर्वांच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण झाली ! पुचाट गृहमंत्री आणि फुकाचे डायलॉग फेकणारे मुख्यमंत्री यांच्या खेळात मुंबई पोलीस दलाच्या या 20 – 22 अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणात या सर्व कार्यक्षम अधिकाऱ्यांचे हसू झाले ! ( याचवेळी एका महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही अतिशय मानहानीकारक पद्धतीने बदली करण्यात आली ! )हा अधिकार यांना दिला कोणी ?
राज्यभरात 150 – 175 पर्यंत पोलिसांचे मृत्यू झाले ! हजारो पोलीस या कोरोनाच्या उपचारांना सामोरे गेले ! काय कारण होते यासाठी ? सरकारकडे याचं उत्तर आहे का ? याच्या कारणांच्या मुळाशी नंतर जाऊच ! आता या मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीविषयी बोलू !
ठाण्याचे पोलीस आयुक्तपदी असतानाही हे वादग्रस्तच होते ! पोलीस दलात स्वतःची लॉबी करण्याचे आक्षेप अनेकांकडून घेतले जातात ! पण यांच्या कार्यकिर्दीत इकडच्या पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना म्हणजे मा. भिमराव घाडगे यांना ज्या प्रकारे खोट्या आरोपांखाली 15 महिने तळोजा जेलमध्ये अक्षरशः सडवले गेले ! त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीवर बालंट आणले गेले ! यासाठी अशा जिल्ह्यातील सर्वोच्च पदाचा वापर करतात का ?
खरंतर ठाणे आयुक्तपदानंतर यांना सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ पदावर जायचे होते ! त्याचवेळी यांना राज्याचे पोलीस मुख्य महासंचालक पदावर किंवा मुंबई आयुक्त पदावर जायचे होते ! पण तेव्हाच्या सरकारनं त्याचवेळी पोलीस दलातील नियुक्त्यांच्या वेळी ज्या नियुक्त्या केल्या त्या जनतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या ! राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर मा. दत्ता पडसळगीकर , आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी मा. बर्वे यांना कायम ठेवून ठाण्याच्या आयुक्तपदी मा. फणसाळकर आणि इकडे कल्याणलाही परिमंडळ 3 चे उपायुक्त पदी मा. पानसरे यांची नियुक्ती झाली ! या सर्व नियुक्त्या जनतेसाठी व पोलिसदलाच्या प्रतिष्ठेसाठी आश्वासक ठरल्या !
याआधीच्या काही दिवस आधी कल्याणचे एक पोलीस अधिकारी निवृत्त झाले ! त्यांच्यासाठी दोन जंगम कार्यक्रम करण्यात आले ! मोठा खर्च करण्यात आला ! ( एवढे लाखालाखांचे खर्च केले कोणी ? हे कुणी विचारलंच नाही ! त्यात KDMC क्षेत्रात भुरट्या झुंडी पत्रकारांची कुवत सर्वांना माहिती ! ताव मारायला सर्वात पुढे ? ) हे असं प्रथमच घडत होतं !
पण यातील कळस म्हणजे या अशा बोगस कार्यक्रमाला हेच आताचे मुंबई पोलीस आयुक्त म्हणजे त्यावेळी पोलीस महासंचालक पदाच्या दर्जाचे होणारे अधिकारी कल्याणात येऊन या अशा प्रकाराला प्रतिष्ठा देतो त्याचवेळी यांची कार्यपद्धती स्पष्ट झाली !
सदर प्रकरणात या मा. मुंबई पोलीस आयुक्ताबाबतीत त्या तिन्ही यंत्रणा काय निर्णय घेतील ? तेव्हा बघू ! पण आता यांना किमान सक्तीच्या रजेवर तरी पाठवायला हवे होते ! खरंतर त्या 20 – 22 अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या वेळी त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण केली त्याचवेळी एकतर यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता किंवा यांना तेव्हाच मुक्त करायला हवे होते ! पण कदाचित या अनैतिक सरकारातील म्होरक्यांना पुढे यांच्याकडून हे असे 66 दिवस तपास सडवण्यासारखी कामे करून घ्यायची असतील ? म्हणून ठेवलं गेलं असेल !
येत्या काही दिवसांत अधिवेशन सुरू होतंय ! पहिल्याच दिवशी या विषयाची लक्तरे सर्वांसमोर फडकतील ! मुंबई पोलिसांची मानहानीस कारणीभूत ठरणाऱ्या या मा. आयुक्तांकडून तात्काळ कार्यभार काढून घ्यायला हवा !
( या अनैतिक सरकारचे संस्थापक यांचा चार दिवसांच्या कॉरंटाईन काळानंतर वाढलेल्या खुडूक काळात याबाबत आत्मचिंतन झालं की नाही ? त्यांनाच निर्णय घ्यायचा आहे ! ईकडे या सरकारचे प्रमुख झारखंड च्या मुख्यमंत्र्यांना सांगतात की ” लडने का की सरेंडर होने का ? कुणाशी लढाई ? इकडे मृत्यू 25000 वर चालले त्याकडे बघा आधी ! पण हे सांगणार कोण ? थोरले साहेब तर आता खुडूक झाले ? ) आता या मुंबई पोलीस आयुक्तांवर त्यांचा पदभार सोडण्याची कार्यवाही व्हायलाच हवी ! तेव्हाच मुंबई पोलीस दलाची शान कायम राहील !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here