सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोना बळींची संख्या चारशेच्या उंबरठ्यावर असून सोमवारी दिवसभरात 15 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा 661 बाधित आढळून आले. दरम्यान, 384 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून बळींचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी 15 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कडेगाव ता. पाटण येथील 79 वर्षीय महिला, दुर्गापेठ सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, राजापुरी ता. खटाव येथील 30 वर्षीय महिला, गुरुवार पेठ सातारा येथील 67 वर्षीय पुरुष, कवडेवाडी कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, जावळे ता. फलटण येथील 58 वर्षीय महिला. तसेच कराड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये पाटण येथील 76 वर्षीय महिला, गोळेश्वर कराड येथील 55 वर्षीय पुरुष, पापर्डे ता. पाटण येथील 52 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 57 वर्षीय महिला तर सातारा येथील
खाजगी हॉस्पिटलमध्ये शिरवळ ता. खंडाळा येथील 64 वर्षीय पुरुष, डीसीएच म्हसवड येथे पुसेगाव ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 58 वर्षीय पुरुष, पुसेसावळी ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, भाटी ता. माण येथील 55 वर्षीय महिला अशा एकूण 15 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात रविवारी रात्री 489 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कराड तालुक्यातील सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 11, रविवार पेठ 1, वाकन रोड 1, कराड हॉस्पिटल 3, कार्वे नाका 8, उपजिल्हा रुग्णालय 1, विद्यानगर 2, कोयना वसाहत 1, मसुर 2, पाल 1, कोपर्डे हवेली 3, मलकापूर 5, घारेवाडी 2, येवती 1, बनवडी 1, आगाशिवनगर 1, रेठरे बु. 3, वाडोळी निळेश्वर 1, शेरे 2, वारुंजी 1, येणपे 1, गोलेश्वर 1, गोटे 2, पार्ले 1, काले 2, करवडी 6, रुक्मिणीनगर 1, मल्हारपेठ 1, विरवडे 1, पाडळी केसे 1.
सातारा तालुक्यातील सोमवार पेठ 7, मंगळवार पेठ 2, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 8, रविवार पेठ 5, शाहुपरी 4, चाळकेवाडी 1, सैदापूर 3, करंजे 3, शाहुनगर 3, अतीत 1, पोलिस ऑफिसर्स क्वार्टर 1, खेड 4, बोरखळ 1, भवानी पेठ 1, सासपडे 1, यादोगोपाळ पेठ 1, कोडोली 3, सहकारनगर 1, सदर बझार 2, डबेवाडी 7, लिंब 3, गोवे 2, वडूथ 4, तामजाई नगर 2, सिव्हिल क्वार्टर 1, एस. पी. ऑफिस 2, वळसे 1, गोळीबार मैदान 1, सिटी पोलिस लाईन 1, सोनगाव तर्फ 1, अपशिंगे 6, नागठाणे 7, वर्ये 1, सिव्हिल कॉलनी संभाजी नगर 3, गोडोली 3, बोरगाव 1, श्री नगर एमआयडीसी 4, गडकर आळी 1, नांदगाव 1, सुर्यवंशी कॉलनी 1, दिव्यनगरी 1, सातारा 7, हरे कृष्ण पॅराडाईज 1, एमआयडीसी 2, संगमनगर 2, वनवासवाडी 2, दुर्गापेठ 1, भरतगाव 1, महागाव 2, अंगापूर 1, गेंडामाळ 2, परळी 1, हमदाबाद 4.
पाटण तालुक्यातील पाटण 2, दिवशी बु. 1, पीएचसी मोरगीरी 10. वाई तालुक्यातील वाई 1, सोनगीरवाडी 3, उडतरे 5, बावधन 1, भोगाव 2, गितांजली हॉस्पिटल 1, जांब 1, शेंदुरजणे 1, शहाबाग 1, काळंडवाडीर 9, यशवंतर नगर 1, धर्मपुरी पेठ 1, गणपती आळी 2, रविवार पेठ 4, हुमगाव 1, सह्याद्रीनगर 1, रामडोह आळी 4, मुंगसेवाडी 1, ज्ञानदेवनगर 1, यशवंतनगर 1, सदाशिव नगर 1, भुईंज 1, विरमाडे 1, ब्राम्हणशाही 1, पाचवड 2, वाई 2. कोरेगाव तालुक्यातील सोनके 1, कोरेगाव 10, एकंबे 2, गोळेवाडी 1, मंगळापूर 2, कुमठे 6, जळगाव 2, भाकरवाडी 2, कठापूर 1, रहिमतपूर 1. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, भिलार 2, गवळी मोहल्ला 5, नगरपालिका 6, दरे कुंभरोशी 1, रांजनवाडी 1, एमआयडीसी 5, पोलिस स्टेशन 1.
जावली तालुक्यातील जावली 1, आंबेघर 14, गावडी 7, मेढा 1, बामणोली 1, भोगवली 1, अनेवाडी 2, हुमगाव 1. खंडाळा तालुक्यातील शिरवळ 7, निंबोडी 4, पिसाळवाडी 1, पळशी 1, हराळी 1, खंडाळा 5, चोरडे 1, शिरवळ 1, मोर्वे 1, बावडा 5, केसुर्डी 2, खेड 4. फलटण तालुक्यातील विडणी 3, बिबी 1, जाधववाडी 1, मलठण 5, तरडगाव 7, बरड 3, शिंदेनगर 2, पिंपरद 2, फलटण 5, सातेफाटा 2, धुळदेव 2, राजाळे 1, शुक्रवार पेठ 1, तांबवे 1. खटाव तालुक्यातील मायणी 8, कातरखटाव 10, चोराडे 1, राजापुरी 1, वडूज 2, सिध्देश्वर कुरोली 4, विसापूर 6, निढळ 1, पुसेगाव 11, खातगुण 1. माण तालुक्यातील म्हसवड 1, दहिवडी 4, निमसोड 1, पांगारी 1, माळवाडी 1 यासह बाहेरील जिल्ह्यातील इस्लामपूर 2, सांगली 1, अशा एकूण 489 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.







