नाशिक (विशेष प्रतिनिधी इजि.कुबेर जाधव) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांची सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत आज कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन अर्जुन पवार यांनी मुंबई येथे भेट घेतली. तालुक्यातील शेतकरी बांधवाना कांदा लागवडीसाठी कांदा बियाणे स्वस्त दरात उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
खा.शरद पवार यांनी याबाबत तात्काळ माहिती व बियाणे स्वस्त दरात उपलब्ध होणेबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या व शेतकऱ्यांना माफक दरात बियाणे उपलब्ध करुन देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
प्रत्येक कंपनीने आपले बियाण्याचे भाव जास्तीत जास्त मे महिन्यांपूर्वी जाहीर करावे. यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागणार आणि मागील इतिहास बघता सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याचे भाव हे वाढलेलेच असतात.याचा फायदा कंपन्या घेत आहेत.यासाठी नियमावली व जीआर काढावाच लागेल.यामुळे बोगस कंपन्या आणि ऐनवेळेस फायदा ह्या गोष्टीला चाप बसेल.या साठी कांदा उत्पादक संघटनेने आतापासूनच सुरुवात केली आहे
संघटनेने अनेक कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यात कृषी विभाग फक्त एमआरपीपेक्षा जास्त भावाने विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करू शकते आणि कोणतीच बियाणे कंपनी उत्पादन खर्च व त्यावरील निकष लागू करून एमआरपी ठरवत नाही. त्यासाठी कोणतीच नियमावली तयार नाही असे सांगितले.या साठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू. नाहीतर हा भाव दरवर्षी वाढतच राहणार, असा निष्कर्ष चर्चेअंती निघाला.
सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक सूचनावजा विनंती आहे, ह्या वर्षी जे बियाणे घ्याल त्याची पावती व फोटो अवश्य काढून ठेवा. आपल्याला एव्हढे पैसे खर्च करून त्याचे उत्पादन पण जाहीर करायचे आहे नावानिशी. म्हणजे पुढच्यावेळेस आपल्या सोबत इतर शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही आणि बोगस बियाण्या वाल्या कंपन्यांना चाप बसेल
– कुबेर जाधव







