प्रभाग १५ मधील आदिवासी विभागातील महिला व पुरुष यांचे कोरोना लसीकरण

आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी यांचा कोरोनायोध्दा सन्मान

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : येथील वागळे ईस्टेट कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी लसीकरण खुप महत्वाचे आहे, डोंगर वसाहत भागात लसीकरणाबाबत नागरीकांनामध्ये जनजागृती करणे म्हत्वाचे होते.ह्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील प्रभाग क्रमांक १५ इंदिरा नगर रुपादेवी टेकडी याठिकाणी छत्रपती क्रिडा मंडळ, ठाणे महानगर पालिका व महाराष्ट्र पोलीस गृहरक्षक संघर्ष समितीच्या संयुक्त विद्यमाने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

इंदिरा नगर रुपादेवी टेकडी हा डोंगर वसाहत भाग असल्यामुळे नागरीकांना लस घेण्यासाठी फार दूर जावे लागत असे.हीच बाब लक्षात घेता छत्रपती क्रिडा मंडळ व महाराष्ट्र पोलीस गृहरक्षक संघर्षच्या वतीने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या लसीकरण शिबिरात १०० हुन अधिक जणांनी उत्स्फूर्तपणे लसीकरणाचा लाभ घेतला आहे.

thane-medical-camp

सदर कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष विजेंद्र कदम व मंडळाचे प्रमुख सल्लागार तसेच,महाराष्ट्र पोलिस गृहरक्षक संघर्ष समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश बनसोडे यांच्या माध्यमातून या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.त्याचबरोबर या लसीकरण शिबिराला उपस्थित असलेल्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, नर्स, डॉक्टर, आणि संपूर्ण स्टाफ यांना कोव्हिड योध्दा म्हणून आपली भुमिका बजावत असणाऱ्या डॉक्टर व परीचारीका यांचा पोलीस गृहरक्षक संघर्षच्या वतीने कोव्हिड योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.

thane1

यावेळी उपस्थिती सतीश बनसोडे, विजेंद्र कदम, सौ. प्रतीक्षा सतीश बनसोडे,सौ.संगीता रमेश शाहू, श्रीमती. वैशाली कदम,जगन सिंग, संजय पाटील, कमलाकर डिचोलकर, विनोद कदम स्थानिककार्यकर्ते व महिला आदी जण उपस्थित होते.

thane 2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here